प्रणाम भारत

प्रणाम भारत

भारताच्या इतिहासात स्वातंत्र्य लढ्याला अनन्यसाधारण महत्व आहे. फार मोठा कालखंड, अनेक क्रांतिकारकांच्या बलिदानाने, त्यागाने लिहिला गेला आहे. यंदा आपण स्वतंत्र भारताचा अमृत
महोत्सव साजरा करीत आहोत. परंतु आजही अनेक क्रांतिकारकांचे कार्य म्हणावे तितके सर्वांपर्यंत पोहोचलेले नाही. अशा परिस्थितीत क्रांतिवीरांप्रती
कृतज्ञता व्यक्त करावी व समाजात राष्ट्रप्रेम जागृत व्हावे या उद्देशाने नाट्यसंपदा कला मंच सादर करीत
आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात हुतात्मा झालेल्या क्रांतिवीरांच्या जीवन चारित्रावर आधारित एक अनोखा नाट्याविष्कार – प्रणाम भारत.

या नाट्याविष्काराचे प्रयोग, महाराष्ट्रातील नाट्यगृह, शाळा, महाविद्यालये, लोकमान्य संस्था, तसेच मोठ्या रहिवासी संकुलांमध्ये करण्याचा नाट्यसंपदा कला मंचचा प्रयास आहे.

हा उपक्रम व्यावसायिक नाही पण विषय राष्ट्रीय अस्मितेचा आहे व तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा ही आमची ईच्छा आहे.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns