मनसेचा सोनी टेनला धक्का ” अल्टिमेट खो-खो लीग २०२२” स्पर्धेचे समालोचन मराठी भाषेतून झालंच पाहिजे.

मनसेचा सोनी टेनला धक्का ” अल्टिमेट खो-खो लीग २०२२” स्पर्धेचे समालोचन मराठी भाषेतून झालंच पाहिजे.

मराठी मातीतील खो-खो या खेळाची ”अल्टिमेट खो-खो लीग २०२२” स्पर्धा आपल्या सोनी वाहिनीवरून दिनांक ११ ऑगस्ट २०२२ ते ४ सप्टेंबर २०२२ या कालावधीत प्रक्षेपित करण्यात येणार आहे.
मराठी क्रीडा प्रेमींकडून ”अल्टिमेट खो-खो लीग २०२२” स्पर्धेचे स्वागत होत असेल तरी या खेळाचे समालोचन हिंदी, इंग्रजी, तामिळ आणि तेलगू भाषेतून होणार आहे पण मराठी भाषेतून होणार नाही याची मराठी भाषिकांना खंत आहे. त्यामुळेच मराठी क्रीडा प्रेमी आणि मराठी भाषिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
या करीता सोनी वाहिनीस निवेदन दिले की, ”अल्टिमेट खो-खो लीग २०२२” यांचे समालोचन मराठी भाषेतून करावे. अन्यथा मराठी भाषिकांकडून होणाऱ्या आंदोलनाची जबाबदारी सर्वस्वी सोनी वाहिनीची असेल त्यामुळे या निवेदनाचा गांभीर्यपूर्वक विचार करावा. व त्वरित कार्यवाही करावी.
अमेय खोपकर -मनसे चित्रपट सेना अध्यक्ष , यांच्या नेतृत्वाखाली सोनी वाहिनीवर निवेदन दिले
त्यांच्या सोबत विरेंद्र जाधव , सुशांत माळवदे, हेमंत साळवी, शशांक नागवेकर, संदिप सावंत,विशाल हळदणकर, उपविभागध्यक्ष- चित्रपटसेना चिटणीस,उपचिटणीस,शाखाध्यक्ष उपस्थित होते

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns