‘एक नंबर… सुपर’ची धमाल ! १ एप्रिलला चित्रपटगृहांमध्ये
दिग्दर्शक मिलिंद कवडे ‘टकाटक’च्या अभूतपूर्व यशानंतर पुन्हा एकदा ‘एक नंबर… सुपर’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या चित्रपटातील ‘बाबूराव…’ आणि ‘तुकडे तुकडे…’ या गाण्यांवर प्रेक्षक अक्षरश: फिदा झाले असून येत्या १ एप्रिल २०२२ रोजी ‘एक नंबर… सुपर’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘एक नंबर… सुपर’ या चित्रपटाची निर्मिती महेश शिवाजी धुमाळ, जितेंद्र शिवाजी धुमाळ आणि मिलिंद कवडे यांनी धुमाळ प्रोडक्शनच्या बॅनरखाली आऊट ऑफ द बॉक्स फिल्म्सच्या सहयोगानं केली आहे. काहीशा वेगळ्या जॅानरच्या माध्यमातून मनोरंजनाद्वारे एखादा विचार देणाऱ्या मिलिंद यांच्या कारकिर्दीतील ‘एक नंबर… सुपर’ हा आणखी एक वेगळ्या पठडीतील चित्रपट आहे. विनोदी अंगानं भाष्य करणारं कथानक आणि त्याला साजेसा कलाकारांचा उत्तम अभिनय हे या चित्रपटाचं मुख्य आकर्षणाचं केंद्र आहे. प्रत्येक कॅरेक्टरची वेगळी ओळख, मुख्य कलाकारांच्या साथीला सहकलाकारांची लक्षवेधी कॅरेक्टर्स, कथेच्या प्रवाहाशी एकरूप होऊन मनोरंजन करणारी गाणी, अर्थपूर्ण शब्दरचना, मनमोहक संगीतरचना, उत्कंठावर्धक पटकथा लेखन, मनाला भिडणारं संवादलेखन आणि दर्जेदार निर्मितीमूल्यांच्या साथीनं दिग्दर्शित केलेला एक उत्तम सिनेमा असं ‘एक नंबर… सुपर’चं वर्णन करता येईल.
‘टकाटक’नंतर या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासाठी मिलिंद यांनी पुन्हा एकदा प्रथमेश परबचीच निवड केली आहे. प्रथमेशच्या जोडीला यात या चित्रपटात मिलिंद शिंदे, गणेश यादव, निशा परूळेकर, अभिलाषा पाटील, आयली घिया, ऋषिकेश धामापूरकर, अक्षता पाडगावकर, प्रणाली संघमित्रा ढावरे, सुमित भोक्से, सुनिल मगरे, हरिष थोरात, आकाश कोळी आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. दिग्दर्शनासोबत ‘एक नंबर’ची कथा व पटकथा मिलिंद कवडे यांनीच लिहिली आहे, तर संवादलेखन संजय नवगिरे यांनी केलं आहे. पार्श्वसंगीत अभिनय जगताप यांनी पार्श्वसंगीत दिलं आहे, तर संकलनाची बाजू प्रणव पटेल यांनी सांभाळली आहे. पटकथा सहाय्यक म्हणून संजय नवगिरे आणि सुनिल मगरे यांनी काम पाहिलं असून, डिओपी हजरत शेख (वली) यांच्या अनोख्या सिनेमॅटोग्राफीच्या माध्यमातून ‘एक नंबर… सुपर’ हा चित्रपट प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.