‘सोयरीक’ या चित्रपटातील आपल्या पहिल्या वहिल्या पोलीस भूमिके विषयी शशांक शेंडे यांनी ‘मुंबई न्यूज’ ला सांगितलेला किस्सा
“मकरंद मला जेव्हा सांगितले की या चित्रपटात तुम्हाला पोलिसाची भूमिका करायची आहे तेव्हा प्रथम मला आश्चर्य वाटले कारण आत्तापर्यंतचा माझा अनुभव फाटक्या कपड्याचा, गरीब, दिनवाणा अशा भूमिका मला मिळत होत्या, मात्र एकदम पोलिसांची भूमिका मला ऑफर झाल्यावरती मला आनंद पण झाला पण तो आनंद कसला तर मी मनात म्हटलं चला या निमित्ताने मला नवीन कपडे मिळतील घालायला याचा.
मी मकरंदला लगेच हो म्हणून टाकले पोलिसाची भूमिका करायला तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत, का… तर जेव्हा तुमच्या अंगावर तो गणवेश ते बूट, हातात काठी, कमरेला रिव्हॉल्वर डोक्यावर कॅप येते तेव्हा आपसूकच तुमची चाल बदलते, वागण्यात बोलण्यात वेगळेपण येते चेहेऱ्यावर करारीपणा येतो मला असे वाटते कपड्याची गंमत आहे ती!
ह्या चित्रपटात मी पोलिस अधिकाऱ्याची भूमिका बजावत आहे व तो एक उत्प्रेरक आहे म्हणजे घटना घडवायला मदत करणारा हा उत्प्रेरक आहे.
बरं ह्या चित्रपटात जितके म्हणून कलाकार आहेत त्यांच्या वाटेला ज्या भूमिका आल्या आहेत त्या नक्की त्यांनी काय करायचं याची स्क्रिप्ट मकरंद ने कोणालाही दिली नव्हती ज्या दिवशी आपण येणार त्यादिवशी हातात स्क्रिप्ट पडायची व तुम्ही शूटिंग सुरू करा असे सांगितले जायचे, थोडक्यात आपण नाटकांमध्ये कसं करतो त्या टाईप हे सगळं होतं.
बरे हे सर्व माझ्यासाठी नवीन होतं चित्रपटासाठी हे पहिल्यांदाच करत होतो, मला स्क्रिप्ट माहिती नाही, मला काय बोलायचे ते ही माहिती नाही, माझ्या मते मुळात ॲक्टरहा पांगळाच असतो त्याला जोपर्यंत शब्दांच्या कुबड्या मिळत नाहीत तोपर्यंत तो हतबल असतो. इतर वेळी काय असतं ऍक्टर कडे स्क्रिप्ट अगोदरच गेलेली असते तो ती स्क्रिप्ट वाचून दुसऱ्या दिवशी शूटिंगला तयार होऊन येतो व तो सीजन ॲक्टर असतो त्यामुळे त्याला माहिती असतं की या सिच्युएशनल आपण काय करायला पाहिजे आपण कुठे लूक द्यायला पाहिजे, आपण चेहऱ्यावरती हावभाव काय करायला पाहिजेत मात्र ही जी प्रोसेस आहे ही माझ्या दृष्टीने लर्निंग प्रोसेस होती. त्यामुळे मी सीजन ऍक्टर असून सुद्धा नवखा होतो तर माझ्या समोर जी नवीन मुलं होती ती ही नवखी होती . मात्र त्यात एक धोखा होता माझ्या समोर जी नवीन पिढी होती तिला असे वाटू शकते की हा म्हणजे मी काय करतोय याला अभिनय येतो की नाही?
मात्र सगळं आपसूकच झाले आणि त्यातून एक चांगल निर्माण झालं असं मला वाटतं”
‘फाटक्या कपड्या वरून कडक इस्त्रीचे कपडे घालायला मिळणार याचाच मला जास्त आनंद झाला’ – शशांक शेंडे
+1
+1
+1
+1