मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हा निराश करणारा असून आरक्षणाचा अधिकार केंद्र आणि राष्ट्रपतींचा असल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितल्याने आता सुप्रीम कोर्टाने सुचवल्याप्रमाणे राष्ट्रपती व पंतप्रधानांनी निर्णय घ्यावा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
आरक्षणाची लढाई राज्यसरकार समर्थपणे लढले. शांतता बाळगल्या बद्दल मराठा समाजाला आणि नेत्यांना धन्यवाद देतो तसेच छत्रपती संभाजी राजे यांनीही समंजसपणा दाखवल्या बद्दल त्यांचे आभार मानतो असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मात्र मराठा आरक्षणाबाबतची लढाई अजून संपलेली नाही इतर कायद्यांप्रमाणे मराठा आरक्षणाबाबत ३७० कलम हटवताना जी हिंमत दाखवली तीच हिंमत मराठा आरक्षण प्रकरणी दाखवावी असेही मुख्यमंत्रांनी सांगितले.
मराठा समाज लढवय्या आणि शांतताप्रिय प्रिय असून आता जास्त वेळ न घालवता केंद्रानं निर्णय घ्यावा, याबाबत उद्या केंद्र सरकारला मुख्यमंत्री स्वतः पत्र लिहिणार असल्याचे समजते.
मराठा आरक्षणा बाबत आता राष्ट्रपती व पंतप्रधानांनी निर्णय घ्यावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
+1
+1
+1
+1