अभिनय हे सोपे काम नाही. यामधील भव्यता व ग्लॅमर अनेकांना या सृष्टीमध्ये येण्यास आकर्षित करत असले तरी भूमिकेसाठी करावी लागणारी तयारी अत्यंत खडतर काम आहे. कलाकाराला विविध भूमिका साकारण्यासोबत समान कौशल्यासह त्या भूमिका सादर करायचे असेल तर काम अधिक खडतर होऊन जाते. असाच एक अत्यंत प्रतिभावान कलाकार आहे आपला लाडका राम यशवर्धन, जो एण्ड टीव्हीवरील मालिका ‘कहत हनुमान जय श्री राम’मध्ये महादेवची भूमिका साकारताना दिसत आहे. राम भगवान शिवचे एक नाही, तर सहा वेगवेगळे अवतार साकारताना दिसणार आहे. ४८ तासांसाठी प्रखर तांडव नृत्य करण्यापासून मालिकेमध्ये भगवान शिवचे सहा वेगवेगळे अवतार साकारण्यापर्यंत असे धैर्य, आवड व कठोर परिश्रम आज टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये क्वचितच दिसून येते. आगामी नवीन एपिसोड्समध्ये राम यशवर्धन भगवान शिव यांचा उग्र वीर भद्र अवतार, ज्ञानी ऋषी पिपलाद अवतार, भटक्या यतिनाथ अवतार, संतप्त अवधूत अवतार, परोपकारी भिक्षुवर्य अवतार आणि स्वभाववादी दुर्वासा अवतार या अवतारांमध्ये दिसणार आहे.
भगवान शिव यांचे विविध अवतार साकारण्याबाबत बोलताना राम यशवर्धन म्हणाला, ”काहीच व्यक्तींना अभिनयाचे बारकावे सादर करण्याची संधी मिळते. मालिका ‘कहत हनुमान जय श्री राम’मध्ये भगवान शिव यांचे विविध अवतार सादर करण्याच्या अनुभवामुळे माझ्या विचारसरणीमध्ये बदल झाला आहे, जे पूर्वी माझ्यामध्ये नव्हते. आजच्या काळात व युगात भगवान शिव यांच्यासारखी शक्तिशाली पौराणिक भूमिका साकारण्याची संधी क्वचितच मिळते. मी महादेवची भूमिका साकारत असताना अभिनयाची ही बाजू सादर करण्याची संधी मिळाल्याने स्वत:ला भाग्यवान समजतो. मला त्यांचे सहा वेगवेगळे अवतार साकारण्याची संधी मिळाली आहे. ते अत्यंत आव्हानात्मक आहे. विविध मेक-अप सत्रांसाठी दीर्घकाळापर्यंत बसून राहणे ते एकूण पेहराव परिधान करण्यापर्यंत गोष्टी सोप्या नसल्या तरी मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. तसेच मी कॅमे-यासमोर जाण्यापूर्वी प्रत्येक अवताराची विशेषता आत्मसात करण्याची खात्री घेईन.”
तो पुढे म्हणाला, ”प्रत्येक अवतारामधील भावना सादर करणे हे सर्वात आव्हानात्मक आहे. शिवजींचा पिपलाद अवतार वेदिक ऋषी, संयमी, रचित व शांतपूर्ण आहे. त्यांचा दुर्वासा अवतार अत्यंत संतप्त आहे. दुसरीकडे त्यांचा वीर भद्र अवतार उग्र व भयंकर आहे. या अवताराच्या लुकमधून ते दिसून येते. प्रत्येक अवतारामधील विरोधाभास अद्वितीय आहे. म्हणून कॅमे-यासमोर या सर्व अवतारांची भावना सादर करण्यासाठी कराव्या लागलेल्या तयारीबाबत एखादी व्यक्ती फक्त कल्पनाच करू शकतो. पण माझ्यासाठी त्या सर्व भावना आत्मसात करणे महत्त्वाचे होते. मी अधिककरून सामावून गेलेला अवतार म्हणून भिक्षुवर्य अवतार. हा अवतार सर्व मानवजातींचा संरक्षक म्हणून ओळखला जातो. दयाळू व करूणामय असलेला हा सर्व अवतारांपैकी सर्वात सहानुभूतीशील अवतार आहे. माझ्या करिअरमधील हा सर्वात संपन्न व उज्ज्वल अनुभव आहे.”
‘कहत हनुमान जय श्री राम’ मालिका भगवान हनुमानाच्या न दिसण्यात आलेल्या अनेक छटांना सादर करते. भगवान विष्णूने पृथ्वीवर भगवान रामच्या रूपात जन्म घेतल्यानंतर दुष्ट रावणाचा पराभव करण्याच्या उद्देशामध्ये भगवान रामाला मदत करण्यासाठी भगवान शिवने भगवान हनुमानाच्या रूपात जन्म घेतला. भगवान हनुमान हे भगवान शिवचे अकरावे रूद्र अवतार होते. चालू एपिसोड्समध्ये अंजनी माता (स्नेहा वाघ) बाल हनुमानाला त्याचा मूळ उद्देश संपादित करण्याकरिता त्याच्या शक्तीला चालना देण्यासाठी प्रत्येक अवतारामधील विविध धडे शिकून घेण्याच्या हेतूने कथा सांगताना दिसत आहे. ही मालिका प्रेक्षकांना भगवान शिव व अमर दुष्ट रावण यांच्या न ऐकण्यात आलेल्या कथांची झलक दाखवते. बाल हनुमान कशाप्रकारे भगवान रामाचे महान भक्त बनतात आणि रावणाच्या दहशतीच्या राज्याचा विध्वंस करण्यामध्ये यशस्वी होतात याचा पौराणिक प्रवास या मालिकेमध्ये पाहा.
पाहा ‘कहत हनुमान जय श्री राम’ आणि सर्व सहा अवतारांना दर सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता फक्त एण्ड टीव्हीवर!