१८व्या आशियाई चित्रपट महोत्सवाचे शानदार उद्घाटन,
दिग्दर्शक आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उषा जाधव यांचा विशेष सत्कार.
१८व्या आशियाई चित्रपट महोत्सवाचे शानदार उद्घाटन मुंबईत प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिर इथे झाले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
या उद्घाटन सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे पाणी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल दिग्दर्शक आदिनाथ कोठारे आणि गोव्याच्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात माईघाट चित्रपटाची नायिका उषा जाधव यांना आंतरराष्ट्रीय ज्युरींनी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार दिला याबद्दल त्यांचा सत्कार केला गेला.
पुरस्कार मिळतात कौतुक केले जाते पण घरच्यांनी केलेला सत्कार हा माझ्यासाठी विशेष जवळचा आहे,या शब्दात अभिनेत्री उषा जाधवने १८व्या आशियाई चित्रपट महोत्सवाचे आभार मानले.
जगातले सर्वोत्कृष्ट सिनेमे समाविष्ट असलेल्या महोत्सवात आपला सिनेमा ‘उद्घाटनाचा सिनेमा’ असावा हे मी माझे भाग्य समजतो. महोत्सवातला हा मान ‘पाणी’ चित्रपटाला अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत नेणारा असून लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होईल,असे दिग्दर्शक आदिनाथ कोठारे यांनी संगितले.
हा महोत्सव सातत्याने यशस्वी करण्यात मुंबईतल्या दर्दी रसिक प्रेक्षकांचा मोठा वाटा असून त्यांचे तसेच उपस्थित मान्यवरांचे महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम यांनी आभार मानले.
६ मार्च पर्यंत चालणार्या या महोत्सवात आंतरराष्ट्रीय सिनेमांमध्ये इराण, नेपाळ, चायना, कुर्दिस्तान, बांगलादेश, सिंगापूर, कोरिया, भूतान, इस्राइल, कझाकीस्थान, श्रीलंका तसेच राष्ट्रीय सिनेमांमध्ये बंगाली, मराठी, मणिपुरी, कश्मिरी, मल्याळम, असामी, तेलगु, कन्नड, पंजाबी, हिंदी भाषीक चित्रपट पाहायला मिळणार आहेत. यात ऐकूण ४२ चित्रपट आणि २६ लघुपटांचा समावेश आहे.
यंदाच्या महोत्सवाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे आशियाई महिला दिग्दर्शकांच्या सिनेमांची स्पर्धा महोत्सवात असेल.अनुमिता दास दिग्दर्शित ‘फ्लोज फॉर एव्हर’ – बोहोमन ,सुमित्रा भावे दिग्दर्शित ‘दिठी’ , शिल्पा शुक्ला दिग्दर्शित स्टोरीज @८,लाइ क्सुई दिग्दर्शित ‘द टेस्ट फ्रॉम ए हॅपी आयलंड’,अपराजिता घोष दिग्दर्शित ‘मिस्टिक मेमॉइर’,लीना मणिमेकलाइ दिग्दर्शित ‘अॅन अनफेरीटेल’ हे सहा चित्रपट स्पर्धेत असतील . या स्पर्धेसाठी दिग्दर्शक रघुवीर कुल,स्त्री मुक्ति संघटनेच्या नेत्या छाया दातार आणि ज्येष्ठ चित्रपट समीक्षक रेखा देशपांडे मान्यवर ज्यूरी म्हणून काम पाहणार आहेत. या स्पर्धेचे परितोषिक रोख रक्कमेचे असेल.
१८व्या आशियाई चित्रपट महोत्सवाचे शानदार उद्घाटन…
+1
+1
+1
+1