अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवात दीपक कदम यांच्या ‘पुरुषा’ या अतिशय हटके अश्या चित्रपटाला तब्बल ३ पारितोषिके मिळाली, यात उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून विजय कदम यांना तर उत्कृष्ट खलनायिका रंगवल्याबद्दल अंकिता भोईर हिला व उत्कृष्ट पदर्पणातील नायिके साठी प्राजक्ता शिंदेला अशी पारितोषिके मिळाली त्याच प्रमाणे
बेस्ट ग्रामीण चित्रपटासाठी हा चित्रपट नामनिर्देशित सुद्धा झाला होता.
आपल्या पदार्पणातच पारितोषिक मिळवणारी प्राजक्ता शिंदे ‘मुंबई न्यूज’ शी बोलताना म्हणाली “तसे बघावयास गेल्यास मी अभिनयाचा कोणताही कोर्स केलेला नाही माझी आवडती अभिनेत्री माधुरी दीक्षित मी आरशात बघून माधुरी दीक्षित यांचा सारखा अभिनय करायचा प्रयत्न करायची हळूहळू मला ते थोडेफार जमायला लागले, त्यानंतर मी दोन रोमँटिक गाण्याचे व्हिडीओ अल्बम केले, त्या नंतर लोक मला बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखू लागले पण माझे तेवढ्यावर समाधान होणारे नव्हते मला स्मिता पाटील यांचा सारखा अभिनय करायचा होता.
‘पुरषा’ चित्रपटाची स्टोरी ऐकून मी तातडीने दीपक सरांना मी हा चित्रपट करतेय म्हणून सांगितले. मला आशा आहे या चित्रपटाद्वारे लोकांना एक वेगळी प्राजक्ता दिसेल.
सदरहू चित्रपट प्रेक्षकांना पाहण्यासाठी मात्र ऑगस्ट पर्यंत वाट पहावी लागणार आहे कारण हा चित्रपट प्रथम फेस्टिवल मध्ये दाखवला जाऊन नंतर तो ऑगस्ट मध्ये महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यात येईल असे या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक दीपक कदम यांनी मुंबई न्यूज शी बोलताना सांगितले.
या चित्रपटाचे लेखक आहेत राजेश मालवणकर.
दीपक कदम यांचा ‘पुरषा’
+1
+1
+1
+1