– निवडणूक आयोगाकडून २१ ऑक्टोबरला सकाळी ७ ते संध्याकाळी ६.३० दरम्यान एक्झिट पोल दाखवण्यास बंदी
– यापुढे पाकिस्तानात भारताच्या, नद्यांमधील वाट्याचे पाणी जाऊ दिले जाणार नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी
– फेसबुकचे आभासी चलन ‘लिब्रा’ झाले लाँच.
– विरारमध्ये नित्यानंद धाम या इमारतीच्या गॅलरीच्या स्लॅब कोसळून भूमी विनोद पाटील ( वय ६ ) या मुलीचा दुर्दैवी मृत्यू .
– बारावीची लेखी परीक्षा १८ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२० दरम्यान तर दहावीची परीक्षा ३ ते २३ मार्च २०२० दरम्यान होणार, दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर.
– “आपल्या देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज आहे”, आदित्य मला लहान भावा सारखा, येत्या विधानसभेसाठी त्याला माझ्या शुभेच्छा” – अभिनेता संजय दत्त.
– माझी आणि शिवसेनेतील राजकीय कटुता जावयास हवी असेल तर दोन्ही बाजूने प्रयत्न व्हावयास हवेत – नारायण राणे
– नितेश राणे याचा भाजपात प्रवेश मात्र, “आमच्या शाळेत थोडे संयमाने वागावे लागेल,” मुख्यमंत्र्यांनी दिला सल्ला.