महाराष्ट्राची सोशल मीडिया एक्सप्रेशन क्वीन शिल्पा ठाकरे आता चित्रपटामध्ये.

शिल्पा ठाकरे हे नाव चित्रपट आणि टीव्ही माध्यमांसाठी नवीन असेल मात्र इंटरनेटवर तिच्या एक्सप्रेशन मुळे ती अत्यंत लोकप्रिय कलाकार आहे. टिकटॉक , लाईक आणि यु ट्यूब सारख्या सोशल प्लँटफॉर्मन्सवर तिचे एक्सप्रेशनचे व्हिडिओ हे अत्यंत वायरल आहेत. लाखोंनी तिचे चाहते आहेत आणि तिच्या नव्या व्हिडिओंची अत्यंत आतुरतेने ते वाट पाहत असतात. आता हि सोशल मीडिया क्वीन शिल्पा ठाकरे चित्रपटांमध्ये तिचे भाग्य आजमावणार आहे. तिच्या या एक्सप्रेशन च्या चाहत्या वर्गामुळेचं तिचे खिचिक, ट्रिपल सीट आणि भिरकीत हे ३ चित्रपट प्रदर्शित सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होतील.

शिल्पा ठाकरे ही मूळची नागपूरमधील एका छोट्या गावातून आलेली मुलगी. स्वतः इलेक्ट्रॉनिक इंजिनियर असून तीने २ वर्ष पुण्यात टेक महिंद्रा या कंपनीमध्ये नोकरी केली. अभिनेत्री होण्याचे स्वप्न मनाशी बाळगून नागपूरच्या छोट्याश्या गावातून पुण्यात आलेली शिल्पा ही रात्रीची कामाची शिफ्ट आणि दिवसा जिथे चित्रपटांची ऑडिशन असतील तिथे जायची. ह्या दोन्ही गोष्टी ती सांभाळत स्वतःच स्वप्न साकारण्याचा प्रयत्न करत होती. मात्र एक दिवस , केवळ एक मजा म्हणून केलेले तिचे एक्सप्रेशनचे म्युझिक व्हिडिओ एवढे वायरल झाले की संपूर्ण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर केवळ एकच नाव होते ते म्हणजे शिल्पा ठाकरे. नेटकरांनी तिला एक्सप्रेशन क्वीन ही उपाधी सुद्धा बहाल केली. व्हाट्स ऍप मुळे अख्ख जग जोडले गेले आहे, त्यामुळे केवळ महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारत, अमेरिका, इंगलंड आणि अनेक देशात व्हाट्स ऍप च्या ग्रुप्स मुळे वायरल झालेले ते व्हिडिओ तिच्या चाहत्यांनी जगभर पोहोचवले. तिची तुफान लोकप्रियता आणि एक्सप्रेशनची कला पाहून तिला चित्रपटांच्या मागण्या स्वतःहून येऊ लागल्या. शिल्पा मागील वर्षी झी युवावरील डान्स महाराष्ट्र डान्स या नृत्यावर आधारित कार्यक्रमात सुद्धा झळकली होती .

तिच्या या प्रवासाबद्दल शिल्पाला विचारले असता ती सांगते ” नागपूर ते पुणे आणि नंतर मुंबई चा प्रवास हा खरच खूप मेहनतीचा होता. एक अभिनेत्री म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपड आणि एक मजा म्हणून केलेल्या व्हिडीओमुळे मिळालेली प्रसिद्धी या दोन्ही गोष्टी जरी वेगवेगळ्या असल्या तरीही माझी मेहनत आणि प्रेक्षकांचे एका वेगळ्या कलाकृतीला दिलेले प्रेम हे नक्कीच महत्वाचे आहे. मला मिळालेल्या संधीचा मी खूप आदर करते आणि यापुढेही युट्युब, नाटक, सिनेमा, वेबसिरीज च्या माध्यमाने प्रेक्षकांपर्यंत पोचण्याचा मी प्रयत्न करत राहीन.”

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns