व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाविषयी मराठी चित्रपटकर्मीना मार्गदर्शन मिळायला हवे

सचिन चिटणीस…

व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाविषयी मराठी चित्रपटकर्मीना मार्गदर्शन मिळायला हवे

परिसंवादात मान्यवरांचा सूर

मुंबई दि.२२: ‘चित्रपटाचे तंत्र आणि त्यातील सध्याच्या संधी’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. नव्या तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर मराठी चित्रपटसृष्टीत उपलब्ध असलेल्या संधींचा वेध परिसंवादात घेण्यात आला. या परिसंवादात ऑस्कर अकादमीचे सदस्य उज्ज्वल निरगुडकर, व्हीएफएक्स तज्ञ पंकज सोनावणे आणि एआय तज्ञ सुप्रिया पाटणकर यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचलन सौमित्र पोटे यांनी केले.

डिजिटल सिनेमॅटोग्राफी, पोस्ट प्रॉडक्शनच्या शक्यता, ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे निर्माण झालेल्या व्यावसायिक आणि सर्जनशील संधी, तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि व्हीएफएक्सच्या मदतीने उभ्या राहत असलेल्या नव्या फिल्म टेक्नोलॉजी अशा विविध पैलूंवर परिसंवादात सहभागी झालेल्या तज्ञानी प्रकाश टाकला. उज्वल निरगुडकर यांनी जागतिक चित्रपट व्यवसायात होत असलेल्या तांत्रिक बदलांचे विश्लेषण केले, तर पंकज सोनावणे यांनी नव्या निर्मात्यांसाठी उपलब्ध असलेल्या आर्थिक पर्यायांबाबत माहिती दिली. सुप्रिया पाटणकर यांनी एआय तंत्रज्ञानातील बारकावे उलगडून दाखवले.

IPRoyal Pawns