लवकरच सह्याद्री एक्सप्रेस मुंबई पर्यंत धावणार – खासदार धनंजय महाडिक
लॉकडाऊनच्या काळात बंद करण्यात आलेली ‘सह्याद्री एक्स्प्रेस’ नंतर केवळ पुण्यापर्यंत सुरू करण्यात आली होते. मात्र नंतर प्रवाशांच्या मागण्यांची दखल घेत ही एक्सप्रेस कोल्हापूर ते पुणे या मार्गावर सुरू करण्यात आली यानंतर ही एक्स्प्रेस मुंबई पर्यंत न्यावी अशी मागणी प्रवाशांकडून सतत करण्यात येत होती मात्र त्याला मुहूर्त मिळत नव्हता. खासदार धनंजय महाडिक यांनी एक्सप्रेस मार्च अखेरीस मुंबई पर्यंत धावेल अशी प्रवाशांना खुशखबर नुकतीच दिली आहे.
आपण रेल्वेच्या संसदीय समितीमध्ये असून, रेल्वेच्या प्रश्नांबाबत तातडीने लक्ष घालून समस्येचे निराकरण करण्यात येईल असेही ते म्हणाले.