*पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नूतनीकृत संकुलाचा उद्घाटन समारंभ २८ फेब्रुवारी ऐवजी २ मार्चला होणार*
मुंबई, दि. २७ फेब्रुवारी
पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नूतनीकृत संकुलाचा उद्घाटन समारंभ २८ फेब्रुवारी ऐवजी २ मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता, रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे आयोजित करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते नूतनीकृत संकुलाचे लोकार्पण होणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार अनिल देसाई, आमदार महेश सावंत आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती समारंभाला लाभणार आहे.
नाट्य, चित्रपट, चित्र, शिल्प यांसह संपूर्ण सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर सोहळ्याला उपस्थित राहणार असून यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे.
—-