*”पाहुणे येत आहेत पोरी…’ स्थळ चित्रपटातलं गाणं सोशल मीडियावर हिट*

*”पाहुणे येत आहेत पोरी…’ स्थळ चित्रपटातलं गाणं सोशल मीडियावर हिट*

*”स्थळ” ७ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला*

लग्नासाठी स्थळ पाहायला जाण्याची लगबग, धावपळ, काळजी व्यक्त करणारं “पाहुणे येत आहेत पोरी…” हे स्थळ चित्रपटातलं गाणं लाँच करण्यात आलं आहे. चित्रपटाच्या टीजरला भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर आता अत्यंत श्रवणीय गाणं दाद मिळवत असून, “स्थळ” हा चित्रपट महिला दिनानिमित्त ७ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सु प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली असून जयंत दिगंबर सोमलकर, शेफाली भूषण, करण ग्रोवर, रिगा मल्होत्रा यांनी स्थळ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. जयंत दिगंबर सोमलकर यांनी चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन केलं आहे. नंदिनी चिकटे, तारानाथ खिरटकर, संगीता सोनेकर, सुयोग धवस, संदीप सोमलकर संदीप पारखी, स्वाती उलमाले, गौरी बदकी, मानसी पवार या नव्या दमाच्या कलाकारांचा चित्रपटात समावेश आहे. . अॅरेंज्ड मॅरेज या संकल्पनेवर बेतलेला आणि ग्रामीण भागातील लग्नाची अत्यंत अनोखी गोष्ट “स्थळ” या चित्रपटातून दाखवली जाणार आहे., महिला दिनाच्या औचित्याने ७ मार्च रोजी ‘स्थळ’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

“पाहुणे येत आहेत पोरी…” हे गाणं मीराबाई येते आणि आशिष नारखेडकर यांनी गायलं आहे. जयंत सोमलकर यांच्या शब्दांना माधव अगरवाल यांनी स्वरसाज चढवला आहे. हार्मोनियमवरची सूरावट आणि नेमका ठेका यांनी गाण्यातल्या शब्दांना आणखी रंजक केलं आहे. चित्रपटात पारंपरिकपणे गायिकांकडून गाणी गाऊन घेतली जातात. मात्र “स्थळ” चित्रपटातलं हे गाणं गाण्याची आवड असलेल्या, पण व्यावसायिक नसलेल्या मीराबाई या चंद्रपूरनजीकच्या महिलेने गायलं आहे.

*Song link*

YouTube player
IPRoyal Pawns