*मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाचे(माई)राष्ट्रीय अधिवेशन येत्या ५ व ६ ऑक्टोबर ला संभाजीनगरात!*
*देशभरातील माध्यमकर्मी होणार सहभागी*
*माध्यमकर्मी महामंडळाबाबत प्रशासकीय जागृतीसाठी *’मीडिया माझा लाडका’ मोहिम!*
*मुख्यमंत्र्यांना आवाहन* …
*दादा , ‘पत्रकार जगवा , मीडिया वाचवा! …*
* मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या ऑनलाईन बैठकीत संस्थापक अध्यक्ष शीतल करदेकर यांनी महाराष्ट्राबाहेरील दिल्लीसह देशातील दहा राज्याच्या माईच्या संघटकांशी झालेल्या बैठकीचा गोषवारा आणि अहवाल बैठकीत सादर केला.*
*दि.१०व ११जुलै ला माई ने केेलेल्या आमरण उपोषणाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल त्यांचे अभिनंदन सर्व संघटकांनी केले ; मात्र सरकारी*पातळीवर अधिकारी दुर्लक्ष करत असल्यामुळे महामंडळाबाबत निवेदन देण्याचे आंदोलन करण्याचे*
*तसेच महाराष्ट्रात ‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’ चे दोन दिवसाचे ‘राष्ट्रीय अधिवेशन’ घेण्याची सूचना सर्वांनी मांडल्याचे सांगितले.*
*● कृतीशील सदस्यांना जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर जबाबदारी देण्यात येणार!!*
*● सदस्यांच्या गृहयोजनेसाठी माई योजना सुरु करण्यात आली आहे*
*●संस्थापक अध्यक्ष शीतलताई करदेकर यांची कमजोर प्रकृती पाहता त्यांनी यापुढे आमरण उपोषण न करण्याची सूचनावजा विनंती सर्वांनीच केली*
* *सरकारने लवकरात लवकर महामंडळाबाबत कार्यवाही केली नाही , महाराष्ट्र सरकारच्या सीएमओच्या उच्च पातळीवरून माई संघटनेसोबत प्राथमिक बैठक घेण्यास तब्बल ६०दिवसाचा कालावधी उलटला! म्हणूूच महामंडळाबाबत प्रशासकीय जागृतीसाठी महाराष्ट्रभरातील जिल्ह्यांतून निवेदन देऊन ‘मीडिया माझा लाडका’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे.*
*● सांस्कृतिक मंत्री ना सुधीर मुनगंटीवार यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर होत असलेल्या कामाच्या प्रगतीची माहिती मुंबईचे संघटन सचिव सचिन चिटणीस यांनी दिली आणि मनोरंजन व सांस्कृतिक क्षेत्रातील पत्रकारांसाठी संघटनेची वेगळी समिती करण्याची जबाबदारी त्यांचेवर सोपविण्यात आली.*
*● लक्ष्मीकांत घोणसे पाटील यांच्या सोशल मीडियासाठी वेगळी समिती करण्याच्या सूचनेनुसार दोन दिवसात वेबपोर्टल यूट्यूब चॅनल च्या प्रतिनिधींची बैठक घेऊन महामंडळामध्ये मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया त्यांच्यासाठी करत असलेल्या कामाची माहिती मुंबईतील शनिवारच्या बैठकीत देण्यात येणार आहे.*
*●दि ५ व ६ ऑक्टोबर २०२४ रोजी*
*संभाजीनगर येथे मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय*अधिवेशन घेण्यात येणार असून या अधिवेशनाचे समन्वयक म्हणून संभाजीनगरचे संस्थापक सदस्य ज्येष्ठ पत्रकार क्रीडा व राजकीय क्षेत्रातील अभ्यासक डॉ अब्दुल कादिर यांना जबाबदारी देण्यात आली आहे.*
*● या अधिवेशनाची रूपरेषा आणि आखणी करण्यासाठी मुंबईत पुढील आठवड्यात बैठक घेण्याचे ठरले.*
*तसेच माननीय मुख्यमंत्र्यांना आवाहन करण्यात आले आहे की *’दादा, पत्रकार जगवा ,मीडिया वाचवा”*
*अशी माहिती मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस*
*डॉ सुभाष सामंत यांनी प्रसिद्धी पत्रकात दिली आहे*