शिवसेनेच्या जनता दरबार वरील माहितीपटाला मिळाले १८ आंतरराष्ट्रीय पुरस्कार

शिवसेनेच्या जनता दरबार वरील माहितीपटाला मिळाले १८ आंतरराष्ट्रीय पुरस्कार

नितीन नांदगावकर यांचा माहितीपट लवकरच ओटीटी वर झळकणार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आणि शिवसेनेतील रॉबिनहूड म्हणून ओळखले जाणारे नितीन नांदगावकर यांच्यावर जनता दरबार नावाचा एक माहितीपट निर्माण करण्यात आला. सुप्रसिद्ध आर्टीष्ट शैलेश आचरेकर यांच्या संकलनाने आणि दिग्दर्शनाने हा 45 मिनिटाचा माहितीपट बनवण्यात आला . हर्षल मीडिया अँड एंटरटेनमेंट एल एल पी निर्मित या माहितीपटाला आजपर्यंत १८ आंतराष्ट्रीय पारितोषिक मिळाली आहेत. शिवसेना भवन येथे दर बुधवारी भरणारा नितीन नांदगावकर यांचा जनता दरबार सर्वश्रुत आहे . सर्वसामान्य माणसाला जेव्हा कुठेच न्याय मिळत नाही तेव्हा तो जनता दरबार मध्ये येतो. पोलीस आणि प्रशासन जिथे हतबल होते तिथे नितीन नांदगावकर यांचा जनता दरबार कामी येतो. अडलेल्यां नडलेल्यांच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी नितीन नांदगावकर कसे काम करतात याची माहिती या 45 मिनिटांच्या माहितीपटात पाहायला मिळते. सर्वसामान्य व्यक्ती आपली समस्या कशी सुटली त्याची माहिती देतात . गेल्या अनेक वर्षांपासून नितीन नांदगावकर ही समाजसेवा करत आहेत . बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा निष्ठावान शिवसैनिक 80% समाजकारण करत आजही कसा कार्यरत आहे हे या माहितीपटात पाहायला मिळते . शैलेश आचरेकर यांचे दिग्दर्शन आणि हर्षल प्रधान यांची निर्मिती असलेला हा माहितीपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्म वर सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे . जनता दरबार या नावाने तो लवकरच प्रकाशित होईल.

+1
0
+1
0
+1
0
+1
0
IPRoyal Pawns