*माध्यमकर्मीच्या हितासासाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर महामंडळ गठीत करावे! – * मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया (माई) ची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी*
*यासाठी सरकारला ८दिवसांची मुदत , नाही तर सनदशीर मार्गाने लढू*- *शीतल करदेकर*
*अर्थमंत्री अजित पवार व उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनाही निवेदन*
*सर्व पत्रकार संघटना व माध्यमकर्मीनी एकजुट दाखवावी*- डॉ सुभाष सामंत
माध्यमांच्या *कक्षा व्यापक झाल्या आहेत मात्र सामाजिक व सर्वच प्रकारच्या सुरक्षेचे अनेक प्रश्न आहेत!
●नवीन कामगार कायदा २०२० मधील पहिल्या २ स्तंभातील नियमांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे!
●पत्रकार रजिस्ट्रेशन,त्रिपक्षीय समिती,महामंडळ गठण,सामुहिक आरोग्य विमा यावर काम होणे आवश्यक आहे.
● राज्य सरकार आपल्या अखत्यारीत, कामगार मंत्रालयाअंतर्गत पत्रकार हितासाठी कल्याणकारी मंडळ तयार करू शकते!
●या अंतर्गत प्रसिद्धी माध्यमाचे हिताचे धोरण योजना आखून अंमलबजावणी करू शकते!
आणि म्हणूनच असंघटित कामगार म्हणून प्रिंट ,इलेक्ट्रॉनिक,डिजिटल , आकाशवाणी आदी प्रसार माध्यमातील पुर्णवेळ, अर्धवेळ,अंशकालीन श्रमिक पत्रकार व पत्रकारेतर कर्मचारीवर्गासाठी *आचार्य बाळशास्त्री जांभेकर महामंडळ असावे अशी मागणी मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या संस्थापक अध्यक्ष शीतल शीतल करदेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
●या अर्थसंकल्पात पत्रकार हितासाठी अर्थमंत्र्यांनी काहीच केले नाही .अर्थसंकल्पात पत्रकारांच्या हितासाठी महामंडळ व त्यासाठी आर्थिक तरतूद करणे आवश्यक होते व आहे .वारंवार निवेदन देऊन मुख्यमंत्री आपल्या अखत्यारीतील या विषयाकडे दुर्लक्ष करीत आहेत.!!● ●म्हणूनच आम्ही यासाठी सरकारला ८दिवसांची मुदत देत आहोत तसेच झाले नाही तर सनदशीर मार्गाने आम्ही आमचा आवाज व.भूमिका मांडू*
*या निवेदनात मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाने पुढील महत्वपूर्ण विषयी मागणी केली आहे*
●पत्रकारांसाठी चे विविध जीआर, सन्मान योजना आहेत त्यात सुधारणा करून सर्वसमावेशक असे एक धोरण तयार करणे आणि अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे.
●विविध माध्यमांतील श्रमिक पत्रकार व पत्रकारेतर कर्मचारी रजिस्ट्रर होणे (पत्रकार कोण याची व्याख्या व त्यांची नोंद होणे)
●या माध्यमकर्मीना अधिस्विकृतीकार्डप्रमाणे माध्यमकर्मी म्हणून ओळख देणारे ‘माध्यमकर्मीकार्ड” देण्यात यावे
●राजकीय, कृषी,साहित्य, सांस्कृतिक ,क्रीडा, आर्थिक आदि क्षेत्रातील माध्यमकर्मीनाही अधिस्विकृती पत्र मिळावे
●राज्यातील माध्यमांसाठी नियमावली तयार करणे ,
●मालकांसाठी आस्थापना सुरु करण्याचा परवाना तयार करताना कर्मचाऱ्यांच्या कामाच्या ,आर्थिक सुरक्षेबाबत करारनामा (एम ओ यु ) योग्यप्रकारे होईल याची पडताळणी होणे(आस्थापना,कर्मचारी हितासाठी ) आणि त्याची पडताळणी होण्यास “त्रिपक्षिय समिती” असावी
●प्रसारमाध्यम मालकांच्या एकूण उत्पन्नाच्या तुलनेत वेतन व वेतनवाढ मिळावी !
●हितकारक योजना कार्यान्वित करणे*
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना-
पत्रकार नोंदी,त्यांचे काम यांची माहिती या महामंडळाद्वारे अद्ययावत होत राहतील त्यामुळे सन्मानपूर्वक वेळेत व क्लिष्टता टाळून जास्त संख्येने पत्रकारांना लाभान्वित करता येईल .
●अ) गृह ब)आरोग्य क)आर्थिक विभाग पत्रकार सहायता समित्यांनी या अंतर्गत काम करावे
●महाराष्ट्रात पत्रकारिता व जनसंपर्क अध्यासन
मुंबई केंद्रात तयार करावे.
या अंतर्गत पत्रकार प्रशिक्षण व संशोधन उपक्रम कार्यान्वित करण्यात येतील
अ)पुरस्कार प्रोत्साहन उपक्रम ब)प्रशिक्षण क)स्पर्धा
स्त्रीपुरूष समानता यावी, त्यासाठी वातावरण निर्मिती करता येईल
अत्यंत अभ्यासपूर्ण आणि माध्यमकर्मीच्या हितासाठी तयार केलेले निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले असून त्याची प्रत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना अजित पवार आणि विधानपरिषद उपसभापती मा.डॉ.नीलम गोऱ्हे यांना दिले आहे.
येत्या ८ दिवसात आमची मागणी मान्य झाली नाही तर सनदशीर अशा सर्व मार्गांचा अवलंब करु; मात्र सरकार संवेदनशील आहे ते सकारात्मक प्रतिसाद देतील ,मात्र यासाठी सर्व पत्रकार संघटना व माध्यमकर्मीनी एकजुट दाखवावी असे आवाहन माई चे स़ंस्थापक सरचिटणीस डॉ सुभाष सामंत यांनी केले आहे.
******
*वाॅटस अप संपर्क: 7021616645*
maimedia24@gmail.com