विंक रिवाइण्‍ड २०२३: सोनाली सोनावणे गायिका म्हणून तर ‘केवड्याचं पान तू’ गाणे म्हणून ठरले मोस्‍ट-प्‍ले 

विंक रिवाइण्‍ड २०२३: सोनाली सोनावणे गायिका म्हणून तर ‘केवड्याचं पान तू’ गाणे म्हणून ठरले मोस्‍ट-प्‍ले

विंक म्‍युझिक या डाऊनलोड्स व दैनंदिन सक्रिय वापरकर्त्‍यांच्‍या आकडेवारीनुसार भारतातील पहिल्‍या क्रमांकाच्‍या म्‍युझिक स्‍ट्रीमिंग अॅपने नुकतेच विंक रिवाइण्‍ड २०२३चे अनावरण केले, ज्‍याअंतर्गत यंदा भारतीय संगीतक्षेत्रात प्रभुत्‍व गाजवलेले अव्‍वल कलाकार, अल्‍बम्‍स व गाण्‍यांची घोषणा करण्‍यात आली.

लोकप्रिय मराठी पार्श्‍वगायिका सोनाली सोनावणे विंक म्‍युझिकवर मराठी भाषेतील मोस्‍ट स्‍ट्रीम आर्टिस्‍ट ठरली आहे. मराठी चित्रपट ‘सरला एक कोटी’मधील गाणे ‘केवड्याचं पान तू’ प्‍लॅटफॉर्मच्‍या मोस्‍ट स्‍ट्रीम मराठी गाण्‍यांच्‍या यादीमध्‍ये अव्‍वलस्‍थानी आहे, ज्‍यानंतर संजू राठोड यांचे गाणे ‘नऊवारी’चा क्रमांक आहे. ‘रेडिओ टॉप २० मराठी’, ‘वाजती टाळ मृदुंग’ आणि ‘एव्‍हरग्रीन मराठी रोमँटिक हिट्स’ या २०२३ मधील मोस्‍ट-स्‍ट्रीम मराठी प्‍लेलिस्‍ट्स आहेत.

यंदाचे रिवाइण्‍ड अद्वितीय घटक देते, जसे म्‍युझिकल झोडेक, इंटरअॅक्टिव्‍ह अॅक्टिव्‍हीटी बॅज, जे चाहत्‍यांच्‍या सहभागावर देखरेख ठेवण्‍यासह अनेक चाहते असलेल्‍या कलाकारांना प्रकाशझोतात आणते. विंक श्रोत्यांना त्‍यांच्‍या टॉप गाण्‍यांच्‍या वैयक्तिकृत प्‍लेलिस्‍टचा आनंद मिळण्‍यासोबत त्‍यांच्‍या आवडत्‍या कलाकाराकडून स्‍पेशल व्हिडिओ मेसेज देखील मिळाला.

स्‍वावलंबी कलाकारांसाठी भारतातील सर्वात मोठी म्‍युझिक डिस्‍ट्रीब्‍युशन इकोसिस्‍टम विंक स्‍टुडिओचा १३०० हून अधिक प्रबळ आर्टिस्‍ट समुदाय आहे. यापैकी ५५ टक्‍के कलाकार ईशान्‍यकडील शहरांसह नॉन-मेट्रोपोलिटन भागांमधील आहेत. यामधून या क्रिएटर्सना सर्जनशील अभिव्‍यक्‍तीसाठी माध्‍यम प्रदान करत आणि उत्‍पन्‍न व दृ‍श्‍यमानतेसह त्‍यांच्‍या आव्‍हानांचे निराकरण करत सक्षम करण्‍यामधील व्‍यासपीठाची भूमिका दिसून येते.

विंक म्‍युझिक अनेक व्‍यासपीठांवर उपलब्‍ध आहे, जसे अँड्रॉईड ड्राइव्‍ह मोड, अँड्रॉईड ऑटो, सिरी, अॅप्‍पल कार प्‍ले, गुगल नेस्‍ट, अॅप्‍पल वॉच आणि गुगल असिस्‍टण्‍ट.

टॉप स्‍ट्रीम मराठी गाणी

*गाणी आर्टिस्‍ट*

*केवड्याचं पान तू* – आर्या आंबेकर आणि अजय गोगावले

नऊवारी संजू राठोड

*झुमका* – संजू राठोड आणि सोनाली सोनावणे

*भरला हा मधुमास* – अजय गोगावले, अजय-अतुल आणि श्रेया घोषाल

*ढगानं आभाळ* – जावेदी अली, वैशाली म्‍हाडे, विनायक पवार, हर्षित अभिराज

*पिरमाची लगन* – रोहित राऊत आणि सोनाली सोनावणे

*गाऊ नको किस्‍ना* – अजय-अतुल, अजय गोगावले, जयेश खरे, मयुर सुकळे

*बुलेटवाली* – जी-स्‍पार्क, संजू राठोड आणि सोनाली सोनावणे

*दिलावर नाव कोरलयं* – राज इरमाळी आणि सोनाली सोनावणे

*आले मराठे आले मराठे* – देवदत्त बाजी आणि सुवर्णा राठोड

 

१. सप्‍टेंबर २०१४: भारतात लाँच; ४ दिवसांमध्‍ये १ लाख डाऊनलोड्सचा टप्‍पा पार

२. फेब्रुवारी २०१५: ५ दशलक्ष अॅप डाऊनलोड्सचा टप्‍पा पार

३. जून २०१५: डेटा सेव्‍ह मोड लाँच

४. नोव्‍हेंबर २०१५: १२ दशलक्ष इन्‍स्‍टॉल्‍सचा टप्‍पा पार

५. जानेवारी २०१६: एमपी३ प्‍लेअर फंक्‍शन-प्‍ले लोकल एमपी३ फाइल लाँच

६. मार्च २०१७: ५० दशलक्ष इन्‍स्‍टॉल्‍सचा टप्‍पा पार

७. जानेवारी २०१८: ७५ दशलक्ष इन्‍स्‍टॉल्‍सचा टप्‍पा पार

८. डिसेंबर २०१८: प्लेस्‍टोअरवर भारतातील सर्वात मनोरंजनपूर्ण अॅप ठरले

९. जानेवारी २०१९: १०० दशलक्ष इन्‍स्‍टॉल्‍सचा टप्‍पा पार

१०. ऑगस्‍ट २०२२: विंक स्‍टुडिओ लाँच

११. ऑगस्‍ट २०२३: विंकने डॉल्‍बीसोबत सहयोग केला

१२. सप्‍टेंबर २०२३: लव्‍ह ऑलसोबत वितरणामध्‍ये प्रवेश

IPRoyal Pawns